पिठोरी अमावस्या (भारतीय मातृदिन ) 🙏🏻
![]() |
Pithori Puja |
श्रावण आमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. पिठोरी अमावस्याचंच दुसरं नाव मातृदिन वंश तसेच मुलांच्या दीर्घ आयुष्य साठी हि पूजा केली जाते सोळा सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घ आयुष्य आरोगय देणारी हि अमावस्या आहे. महाराष्ट्रात या दिवशी पिठोरी व बैलपोळा हे दोन सण साजरे केले जातात. रायगड , ठाणे पालघर, किनारपट्टी भागातील आगरी , कोळी , कुणबी , समाजातील लोक मोठ्या उत्साहाने पिठोरीचा सण साजरा करतात. श्रावण महिन्यातील हा शेवटचा सण होय.
हि प्राचीन परंपरा आहे . परंतु पिठोरी अमावस्या मातृदिन म्हणून देखील साजरा करण्याची प्राचीन परंपरा आहे . हि प्रथा कशी सुरु झाली त्याची हि कहाणी ....
![]() |
Matrudin |
भविष्य पुराणात अशी कथा आहे कि , एका महिलेने मृत बाळाला जन्म दिला . त्यामुळे ती वनात गेली व घोर तपश्चर्य करून ६४ योगिनींना प्रसन्न करून घेतले व माझे बाळ जिवंत राहावे अशी पार्थना केली आणि ६४ जोगिणींच्या आशीर्वादाने तिचे मृत बाळ जिवंत झाले व कित्येक वर्ष जिवंत राहिले . या कथेचा सारांश इतकाच आहे कि , पुत्र जिवंत (सक्रिय) हवा . जिवंत पुत्र म्हणजे गुणवान , संस्कारी असा कुलदीपक . कारण अशी मुलेच आई बापाचे नाव उज्वल करतात . आईचे मस्तक (नाव) जगात उंचावते .भारतीय संस्कृती अशी असंख्य वीरमातांनी विभूषित असते .
गावातील पुरुषमंडळी सकाळी रानात जाऊन पिठोरी पूजेसाठी लागणारी पत्री , पाने ,फुले गोळा करतात .पत्री पुढीलप्रमाणे असते
![]() |
Pithori pujechi patri |
दर्श पिठोरी आमावस्या !दिंड्याची पाने - २. तेरडे - २ वडाच्या फांद्या - २ (१६ १६पाने) लव्हेच्या जुड्या - २ (१६ १६ नग) । तीळ - २ नारलीची वेल, --२ फुलासह कलयीची वेल, शेंदूरलीची वेल, गोमेटाची वेल, हळदीचा फुल, गाभोळी, रान घुंगरू, मंजिरी, कुड्याच्या फांद्या २ (१६-१६पाने) अक्षता वाळू (बनवलेला) देव. लव्हाचा कडा (१६ गाठी ) दुर्वांची अंगठी (१६ गाठी) (वरील १६ प्रकारच्या वस्तू शक्यतो १६ -१६च्याच पटीने घेतात )
नंतर शंकराच्या मंदिराजवळील वाहत्या पाण्यात त्याची पूजा करतात . नंतर झोळीत बांधून घरी आणतात . येताना ''हर हर महादेव '' असा जयघोष करत येतात .
![]() |
Pithache dive |
या दिवशी सर्व पिठाचे दिवे , पिठाचे पदार्थ करतात , म्हणून या अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात .
पिठाचे १६ लव्हे, पिठाच्या ३२ सर साखळ्या ,१६ पातोळ्या बनवल्या जातात एकुण ६४ पिठाचे पदार्थ ६४ योगिनी साठी बनवले जातात.
पिठोरी पुजेचा विधी -
भिंती वर पिठोरी पुजेचा चित्रपट काढला जातो. नंतर केळीच्या पानावर रानातून आणलेल पत्रीचे पूजन केले जाते करताना हातात लव्हा पासून बनवलेले कडे व दुर्वापासून बनवलेली अंगठी घालतात. गंध, अक्षता, बेल, फुल, फळे वाहुन पुजा केली जाते.
![]() |
naivedya |
तांदळाची खीर, पातोरी, माठाची भाजी यांचा नवेद्य दाखवला जातो. पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते. आणि ते डोक्यावर घेऊन 'अतिथी कोण?' ( उचित वाण कोण घेणार ) असे विचारते. तेव्हा मुलं 'मी आहे' असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेतात.पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात.अशा मातांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे श्रावण वद्य अमावास्या म्हणजेच पिठोरी आमवास्या. आता ६ सप्टेंबरला पिठोरी अमावास्या (पोळा) आणि महान भारतीय स्त्रियांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी हाच दिवस (६ सप्टेंबर) मातृदिन म्हणून साजरा करूया.
सर्वाना पिठोरी अमावास्येच्या व बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्या ...
''हर हर महादेव'' ....
🙏👌
ReplyDeleteThank you 😊💓
Delete👌🙏
ReplyDelete😇👍👌👌🙏
ReplyDeleteThank you 😊💓
Delete👌👌👌
ReplyDeleteThank you 😊💓
Delete👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteThank you 😊💓
ReplyDeleteKeep it up with many more information about our culture and also Festival 🤗❤🥰
ReplyDelete