दीप पूजन ( दर्श अमावस्या ) 🪔🌺🙏🏻
शुभं करोति केल्यानं आरोग्यम धनसंपदा ।
शत्रुबुद्धी विनाशाय दीप काय नमोस्तुते ॥
दीपो ज्योती पर ब्रम्ह दीपो ज्योती जनार्दन ।
दीपो हारतु मी पाप संध्यादिप नमोस्तुते ॥
दीप हे मांगल्याचे प्रतीक , दीप हा अंधाराचा नाशक , मग अंधार झाल्यावर घरात लावलेला कंदील असो , देवासमोर तेवणारी समई असो , औक्षण करणारी पंचारती असो , अथवा तुळशीसमोर लावलेली पणती असो, कोणत्या न कोणत्यारूपात दिवा आपल्या सभोवतालचा नाधर दूर करत असतो . आपल्या हिंदू संस्कृती मध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्व आहे . अन याच दिव्याविषयी कृतज्ञता म्हणून दीप अमावस्या साजरी केली जाते .
दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी पासून श्रावण मास चालू होतो . अनेक जण हि अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजरी करताना दिसतात . पुढे श्रावण महिनाभर मांसाहार खाणे निषिद्ध असल्याने या दिवशी म्हणजे आषाढ अमावास्येला मांसाहारावर मनसोक्त ताव मारण्याचा अनेकांचा कल असतो. सध्या गटारी अमावस्या हे नाव इतके प्रचलित झाले आहे कि या दिवशी दीप अमावस्या असते हे देखील अनेकांना माहिती नसते . गटारी अमावास्याचे नादात अनेक जण आपली संस्कृती विसरताना दिसतायेत.
![]() |
Dip Pujan |
दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे . या दिवशी दिव्यांची आरास केली जाते . हि पूजा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करावी . दीप अमावस्येची पूजा विधी पुढीलप्रमाणे :
- सर्वात आधी जमीन स्वच्छ पुसून घ्यावी .
- जमिनीवर पाट ठेवून पाटावर स्वस्तिक काढावे .
- घरातील सर्व दिवे सवच्छ धुवून व पुसून घ्यावेत .
- पाटावर या सर्व दिव्यांची आरास करावी .
- पाट सभोवती रांगोळी काढावी.
- दिव्यांना फुल , गंध , अक्षता वाहाव्यात .
- गोडाचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा .
नमस्कार करून प्रार्थना करावी व पुढील मंत्र म्हणावा
🙏🏻🌺🪔 ''दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥ 🪔🌺🙏🏻
माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची पूजा करून आपली मंगलमय संस्कृती जपूया !
सर्वांना दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा !🪔🌺🙏🏻
Waaa 👏👏
ReplyDeleteThank you ☺
Delete❤😇🙏
Delete